शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 19 एप्रिल 2023 (17:10 IST)

देशसेवा करताना वाशिमच्या सुपुत्राला अरुणाचल प्रदेशमध्ये वीरमरण

Shradhanjali RIP
वाशिम जिल्ह्याचे सुपुत्र अमोल गोरे यांना देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण आले. ते भारतीय सैन्यदलात पॅरा कमांडर म्हणून कार्यरत होते. भारत चीन सीमेवर अरुणाचल प्रदेश येथे बचाव कार्य करताना दोन जवानांना वाचवताना त्यांना वीरमरण आले. ते येत्या 25 एप्रिल रोजी राजा घेऊन गावी येणार होते. त्यापूर्वी त्यांच्यावर काळाने झडप घातली. भारतीय सैन्य दलात पॅरा कमांडर म्हणून देशसेवेचे कर्तव्य बजावत होते.  त्यांना बचाव कार्य करताना वीरमरण आले. 
 
भारत-चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेश या ठिकाणी अमोल गोरे 14 एप्रिलला युनिट 11 एसएफ पॅरासैनिक पेट्रोलिंगमध्ये कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांच्या सोबतचे दोन जवान सकाळी 4 वाजता टेकडीवरुन खाली घसरून बर्फात दबले गेले होते. त्या दोन जवानांना वाचवण्यासाठी गोरे यांनी बर्फामध्ये उडी टाकून दोन जवांनां वाचवले मात्र स्वतःला वाचवू शकले नाही.त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात 4 वर्षांचा मुलगा, पत्नी, आई-वडील, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर आज 19 एप्रिल रोजी  वा. वाशिम जिल्ह्यातील सोनखास या त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील .अमोल गोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
 
Edited By- Priya Dixit