रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जानेवारी 2022 (16:25 IST)

भाजपसाठी योगदान देणाऱ्या कुटुंबांची पुढची पिढी काय करते ? राऊत यांचा सवाल

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी शेअर केलेल्या ट्विटवरून आणखी वादात भर पडली आहे. या ट्विटला पूनम महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पण पूनम महाजन यांच्या निमित्ताने भाजपसाठी योगदान देणाऱ्या कुटुंबांची पुढची पिढी काय करते असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
 
मी ट्विट केलेले व्यंगचित्र हे मी काढलेले नाही. ते व्यंगचित्र हे एक राजकीय तटस्थ भूमिका असणाऱ्या व्यंगचित्रकाराचे म्हणजे आर के लक्ष्मण यांचे व्यंगचित्र आहे. त्यामध्ये प्रमोद महाजन यांचा उल्लेख असल्याने पूनम महाजन यांना अस्वस्थ होण्यासारखी गोष्ट नाही. प्रमोद महाजनांना आक्षेप असता तर त्यांनी ३५ ते ४० वर्षांपूर्वीच आक्षेप घेतला असता. सध्या पूनम महाजन भाजपच्या खासदार आहेत. त्या नक्की कुठे असतात असाही सवाल शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
 
भाजपच्या वाढीमध्ये गोपिनाथ मुंडे, मनोहर पर्रिकर, प्रमोद महाजन यांचे मोठे योगदान आहे. पण या कुटुंबाची पुढची पिढी नेमकी कुठे आहे ?असा सवाल संजय राऊत यांनी केला. पूनम महाजन भाजपच्या खासदार आहेत. त्या सध्या कुठे असतात हादेखील सवाल त्यांनी केला.