रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2022 (22:01 IST)

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भाजपचं योगदान काय?

uddhav
BKC Mumbai : मुंबईत आज शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या (Shiv Sampark Abhiyan) कार्यक्रमाचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी गेल्या महिनाभरापासून शिवसेनेनं जोरदार तयारी केली होती. राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यापासून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची ही खुल्या मैदानावरील पहिली जाहीर सभा आहे. शिवसेना सत्तेत आल्यापासून शिवसेनेवर झालेले आरोप प्रत्यारोप, केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया आणि विशेषत: हिंदुत्वाच्या मुद्दयावरुन शिवसेनेला (Shiv Sena) कोंडीत पकडण्याचे प्रयत्न भाजपकडून झाले. राणा, सोमय्या आणि नंतर राज ठाकरेंनीही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. या सर्व आरोपांना शिवसेनेकडून आतापर्यंत माध्यमांमधून, सोशल मीडियावरुन उत्तर दिली जात होती. मात्र आज पहिल्यांदाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांना जाहीर सभेतून उत्तर देणार आहेत.
 
भाषणाला सुरुवात करताच उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना वाटतंय की, तेच हिंदुत्वाचे कैवारी आहेत. मग समोर बसलेले कोण? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात भाजपचं योगदाना काय? असा सवाल केला.
 
शिवसेना अन् महाराष्ट्र न कधी झुकला, न कधी झुकणार. मुंबईचा बाप शिवसेनाच आहे, ज्याला कुणाला आजमवायचं असेल त्यांनी आजमावून घ्या. माझ्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण होणार असून, या भाषणासाठी ते मोठा दारुगोळा घेऊन येणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. अकबरुद्दी ओवैसी आला तर भाजपची पिलावळं जागी झाली, मात्र 2014 पासून हे ओवैसी राज्यात येतात. हिंदुत्व शिवसेनेमुळे धोक्यात आलं म्हणतात, मात्र तिकडे काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांची परिस्थिती चिंताजनक आहे. आजही काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशाचे नेते होतील. सह्याद्रीप्रमाणं ते हिमालयाच्या सोबत उभे राहतील असं संजय राऊत म्हणाले. तसंच 15 जुनला आदित्य ठाकरे अयोध्येला जातील अशी घोषणा देखील आदित्य ठाकरेंनी केली.
 
कार्यक्रमाला झालेल्या प्रचंड गर्दीत मला सगळे देव दिसले असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. आदित्य ठाकरे यांनी कोविड काळात राज्यात झालेल्या कामांचा उल्लेख यावेळी केला. कोविड सेंटर निर्माण करणं असेल, राज्यातील लसीकरण, लॉकडाऊन सारखे निर्णय वेळेवर घेतले. मुख्यमंत्र्यांनी घरातील सदस्याप्रमाणं कोविडच्या प्रत्येक लाटेत लोकांशी संवाद साधला. कोविडचा लढा कसा द्यावा हे महाराष्ट्राने देशाला नाही तर जगाला शिकवलं असं आदित्य ठाकरे म्हणाले. एकुणच आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात विकास कामांचा खासकरून उल्लेख केला. यामध्ये मेट्रो, महामार्ग, ट्रान्स हर्बर लेन अशा वेगवेगळ्या कामांचा उल्लेख केला.