बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कधी होणार खाते वाटप? वाचा मुख्यमंत्री काय बोलले

राज्यात महाविकासआघाडीच्या स्थापनेनंतर अद्यापही खाते वाटपाची घोषणा करण्यात आलेली नाही. ही खाते निश्चिती कधी होणार याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली .उद्धव ठाकरे म्हणाले, “सध्या आम्ही सातही लोक एकत्रितपणे काम करत आहोत. त्यामुळे कोणीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. अजूनही खातेवाटप झालं नाही मग काय, असं काहीही नाही. आम्ही सध्या सर्व खाती एकत्रितपणे हाताळत आहोत. 
 
त्यामुळे राज्याला पुढे जाण्यात कुठेही अडथळा निर्माण होत नाही. खातेवाटपाचा निर्णय आम्ही पुढील एक ते दोन दिवसात (2 किंवा 3 डिसेंबरपर्यंत) करणार आहोत.” आणखी काही बैठका होऊन राज्याच्या स्थितीचं चित्र आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट होईल. त्यानंतर आम्ही ठरवल्याप्रमाणे सर्व निर्णय घेऊ, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.