शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :वाई , शनिवार, 15 ऑक्टोबर 2022 (15:45 IST)

माकडाला चिप्स देताना दरीत पडला

mahabaleshwar
महाबळेश्वर-प्रतापगड मुख्य घाटरस्त्यावर माकडाला चिप्स देताना खोल दरीत कोसळलेल्या पर्यटकास महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांनी दरीबाहेर काढले. जखमी नेहते हे माकडाला चिप्स देताना कठड्यावरून पाय घसरून सोमवारी दुपारी दरीत कोसळले.
 
संदीप नेहते हे कुटुंबियांसह हरियरेश्वर येतून महाबळेश्वरला पर्यटनास येत होते. आंबेनळी घाट रस्त्यामार्गे येत असता, त्यांना जननी माता मंदिराच्या बाजुला दरीच्या काठड्यावर काही माकडे दिसली. ते गाडीतून उतरून माकडांना चिप्स खायला देण्यासाठी कठड्यावर उभे राहिले. कठड्यावरून पाय घसरल्याने ते शंभर फूट खोल दरीत कोसळले आहेत. माकडांना खायला देणे, या पर्यटकाच्या चांगलेच जीवावर बेतले आहे. परंतु महाबळेश्वर ट्रेकर्सच्या जवानांमुळे ते बचावले आहेत.