मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 एप्रिल 2022 (15:44 IST)

राज ठाकरे यांची औरंगाबादमधील सभा होणार का ?

Raj Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला आयुक्तांनी परवानगी देऊ नये, असे निवेदन अनेक संघटनांनी दिले आहे. त्यामुळे सभेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.  मनसेच्या सभेसंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं बैठकांचं सत्र सुरु आहे. सभेसाठी पोलिसांची परवानगी मिळाली नाही तरी जंगी सभा होणारच, अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी ज्या सांस्कृतिक मैदानावर सभेसाठी परवानगी मागण्यात आली आहे. त्याठिकाणी पाहणी केली. 
 
राज यांच्या सभेला औरंगाबादमध्ये  विरोध वाढत आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी सभेला परवानगी देऊ नये, असे निवेदन अनेक संघटनांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, ऑल इंडिया पँथर सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, गब्बर अॅक्शन कमिटीसह अनेक संघटनांनी सभेला परवानगी देऊ नये म्हणून निवेदन दिले आहे.