शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 3 जुलै 2024 (13:03 IST)

विधानभवनात खळबळ उडाली, मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी आलेल्या महिलेने हाताची नस कापली

vidhan
मुंबईत महाराष्ट्र विधानसभा मान्सून सत्र सुरु आहे. दरम्यान विधान भवनाच्या बाहेर मंगलवारी एका महिलेने आपल्या हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. असे सांगितले जात आहे की, 59 वर्षीय महिलेचा तिच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये वाद होता. विधानभवनात अधिवेशन सुरू असताना ही घटना घडली.
 
तारा साबळे असे या महिलेचे नाव असून तिच्या मनगटावर किरकोळ जखमा झाल्या आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. विधान भवनासमोरील उषा मेहता चौकात सायंकाळी पावणे सहा वाजता हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत साबळे यांना रुग्णालयात नेले. अधिकाऱ्याने असेही सांगितले की, प्राथमिक उपचारानंतर महिलेला डिस्चार्ज देऊन समुपदेशनासाठी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
 
गृहनिर्माण संस्थेशी काही वाद
मिळालेल्या माहितीनुसार, तारा साबळे यांचा ठाण्यातील हाउसिंग सोसायटीत काही वाद आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना भेटण्याची वेळ मिळू शकली नाही.
 
विधानभवनात फक्त दोन दिवस प्रवेश
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरक्षेचे कारण देत आठवड्यातून दोनच दिवस अभ्यागतांना विधानभवनात येण्याची परवानगी दिली असल्याचे सांगितले. मंगळवार आणि गुरुवारीच अभ्यागतांना विधानभवनात येऊ दिले जाईल, असे नार्वेकर यांनी सांगितले.
 
हा आदेश जाहीर करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, विधानभवन संकुलातील गर्दी टाळण्यासाठी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतर मंत्री आणि आमदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. नार्वेकर म्हणाले की, अभ्यागतांना मर्यादित संख्येतच आत प्रवेश दिला जाईल.