गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 नोव्हेंबर 2023 (12:20 IST)

yawatmal : तलावात बुडून वडिलांसमोर दोन मुलींचा दुर्देवी मृत्यू

water death
यवतमाळच्या हिवरी येथे आर्णी मार्गावर मनदेवजवळ जेतवन पर्यटनस्थळ असल्यामुळे पर्यटक भेट देतात. दिवाळीच्या सुट्टीत मामाकडे घरी आलेल्या दोन बहिणींचा परिसराच्या तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे.  

रिया किशोर बिहाडे (12), काव्या धम्मपाल भगत(11) असे या मयत मुलींची नवे आहे. रिया आणि काव्य या आते-मामे बहिणीं होत्या. काव्या आपल्या मामाकडे किशोर बिहाडे यांच्या कडे दिवाळीच्या सुट्टीत आली होती. आई व मामा सोबत ती जेतवन पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी  आली. रिया व काव्या या दोघी परिसरात खेळत असताना त्या तलावात पडल्या आणि बुडू लागल्या. त्यांना बुडताना किशोर बिहाडे यांच्या लहान भावाने पहिले त्याने दोघींना बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरु केली. तिथे असलेल्या काही तरुणांनी त्यांना बाहेर काढण्यात मदत केली.

त्यांना बाहेर काढून तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 
घटनेची माहिती मिळतातच यवतमाळ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली. या घटनेमुळे राहत्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit