मंगळवार, 27 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (21:07 IST)

शिक्षक भरतीसाठी तरुणाचे मंत्रालयात आंदोलन, सुरक्षा जाळीवर मारली उडी, पोलिसांनी घेतले ताब्यात

teachers bharti
शिक्षक भरतीची मागणी करत मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर एका तरुणाकडून उडी घेण्यात आली. मंत्रालयाच्या जाळीवर उडी मारणाऱ्या तरुणाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचा हा तरुण असल्याचे समोर येत आहे. शिक्षक भरतीसाठी त्याने हे आंदोलन केले. दरम्यान त्याने जाळीवर उडी मारल्यानंतर मंत्रालयामध्ये एकच गोंधळ उडाला.
 
शिक्षण भरती करावी या मागणीसाठी तरुणाने मुंबईतल्या मंत्रालयामध्ये आंदोलन केले. या तरुणाने थेट मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केले. यावेळी या तरुणाने जोरदार घोषणाबाजी देखील केल्या. पोलिसांनी सुरक्षा जाळीवर उडी मारून या तरूणाला ताब्यात घेतले.
 
दरम्यान शिक्षक भरती करावी या मागणीसाठी बीडच्या आंबाजोगाई येथून आलेल्या तरुणाने मंत्रालयात आज आंदोलन केले. लवकरात लवकर शिक्षण भरती करण्यात यावी अशी मागणी या तरुणाने केली आहे. हा तरुण उसतोड कामगार आणि प्रकल्पग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे.
 
या तरुणाने सुरक्षा जाळीवर उडी मारल्यानंतर मंत्रालयामध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर मंत्रालयातील पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सुरक्षा जाळीवर उडी मारत या तरुणाला बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे.