सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

2023 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा Happy New Year 2023 Wishes In Marathi

नववर्षाची सकाळ होताच 
तुमचं आयुष्यही व्हावं प्रकाशमय 
नववर्ष तुम्हास आणि कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
तुम्हाला येणारे 12 महिने सुख मिळो, 
52 आठवडे यश आणि 365 दिवस मजेदार जावोत 
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
चिअर्स टू न्यू ईयर 
आणि नव्या संधीसाठी 
जी तुम्हाला नेईल यशाच्या शिखरावर
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक पावलावर तुला मिळो, 
जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो. 
या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. 
 
सूर्यासारखी प्रकाशमान होवो तुझं आयुष्य 
चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
येवो समृद्धि अंगणी
वाढो आनंद जीवनी
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नव वर्षाच्या या शुभदिनी
 
आयुष्यातील अजून एक वर्ष सरत आहे, 
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत. 
सुख, शांती, यश आणि प्रेम 
या सर्व भावनांनी स्वागत करू नववर्षाचं
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
हे वर्ष सर्वाना सुखाचे- समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
 
नवं वर्ष येवो घेऊन येवो सुखाचा प्रकाश, 
नशिबाची दारं उघडावी, 
देव राहो तुमच्यावर प्रसन्न, 
हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
नव्या वर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
सुखांचा झरा तुमच्या जीवनात वाहो
नवीन वर्ष शुभेच्छा
 
नववर्ष म्हणजे जणू कोरी वही 
पेन म्हणजे तुमचा हात 
आणि तुमच्याकडे संधी
नव्या वर्षाची सुंदर कहाणी लिहीण्याची
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
नव्या इच्छा नवी उमेद
मनात एक स्वप्न नवंसं नवं वर्ष
नव्या वर्षाचं स्वागत 
नव्या अंदाजाने करा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
सरत्या वर्षाला निरोप देत
नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करूया,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह नवीन वर्षाची सुरुवात करुया
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
इडा, पीडा टळू दे
आणि नवीन वर्षात
माझ्या मित्रांना
काय हवं ते मिळू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा स्पर्श
प्रत्येक क्षणी लाभू दे न हर्ष
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
हे नातं सदैव असंच राहो
मनात आठवणींचे दिवे कायम राहो
खूप प्रेमळ होता मागील वर्षाचा प्रवास
अशीच राहो या वर्षी देखील आपली साथ
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा