कला आणि विद्येची देवता असलेल्या आणि विघ्नांचे हरण करणाऱ्या या गणेशाचा रूप प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणूनच या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी विविध गणपती मंदिरात भाविकांची गर्दी उसळलेली असते. अशीच गर्दी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरातही दिसून येते. हे मंदिर खूप प्रसिद्ध असून येथे मनोकामना पूर्ण करणारा सिद्धिविनायक आहे. या मंदिरातील गणेशाच्या मूर्तीचे रूप इतर मंदिरातील मूर्तींपेक्षा वेगळे आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणापासून तयार केलेली असून अडीच फूट उंच व दोन फूट रूंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या गळ्यात भुजंग आहे.