शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. श्राद्धपक्ष
Written By

5 लक्षणे, जाणून घ्या आपल्यावर का प्रसन्न आहे पितृ

आमचे पितृ किंवा पूर्वज अनेक प्रकाराचे असतात. त्यातून अनेकांनी दुसरा जन्म घेतलेला असतो तर अनेकांना पितृलोकात स्थान मिळालेलं असतं. पितृलोकात स्थान प्राप्त करणारे प्रत्येक वर्षी आपले वंशज बघण्यासाठी येतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. अनेक लोकांना पितृ दोष देखील सहन करावा लागतो कारण त्यांचे पितृ त्यांच्यावर नाराज असतात. म्हणून पितृ प्रसन्न तेव्हा राहतात जेव्हा ते घरात असे काही घडत असलेलं बघतात....
 
1. दररोज पूजा-पाठ : जर आपण दररोज घरात नियमाने पूजा-पाठ करत असाल, दिवा लावत असाल तर निश्चितच आपले पितृ आपल्यावर प्रसन्न राहतील. जेथे देव पूजा होत नाही, त्यांना नैवेद्य दाखवले जात नाही तेथे राक्षस निवास करतात.
 
2. घरात स्त्रियांचा सन्मान : जर घरात आपण बायको, बहीण, सून, मुलगी, आई अर्थात प्रत्येक स्त्रीचा सन्मान करत असाल, त्यांच्या इच्छा पूर्ण करत असाल तर निश्चितच पितृ प्रसन्न राहतील. ज्या घरात स्त्रीचे अश्रू पडतात तेथे सर्वस्व नष्ट होतं.
 
3. आज्ञाकारी संतान : जर आपली संतान, आपले मुलं आपला सन्मान करतात, आपल्या आज्ञेप्रमाणे वागतात, आपल्या भावनांची क्रद करतात तर आपल्यावर पितृ प्रसन्न राहतील.
 
4. स्वप्नात आशीर्वाद : जर स्वप्नात पूर्वजांनी येऊन आपल्या आशीर्वाद दिला किंवा स्वप्नात साप आपली सुरक्षा करताना दिसला तर समजून घ्या की पितृ आपल्यावर प्रसन्न आहे.
 
5. कामात अडथळे न येणे : आपल्या काम सुरळीत पार पडत असतील, कोणत्याही कामात अडथळे निर्माण होत नसल्यास पितृ आपल्यावर प्रसन्न असल्याचे समजावे.
 
इतर लक्षणे : घरात दिव्याची वात आपोआप सरळ उभी जळणे, श्राद्ध पक्षात अडथळे येत असलेले काम पूर्ण होणे, अचानक धन प्राप्ती होणे, घरातील एखाद्या मृत व्यक्तीची आठवण काढल्यावर लगेच कार्य संपन्न होणे, सर्वांचा साथ मिळणे हे लक्षणे पितृची आपल्यावर कृपा असल्याचे आहे.