मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (15:24 IST)

Gatari Amavasya 2021 यंदा कधी साजरी होणार गटारी जाणून घ्या

हिंदूंच्या आषाढ महिन्यातील अमावास्येचा दिवस महाराष्ट्रात गटारी अमावस्या म्हणून ओळखला जातो. जगभरातील महाराष्ट्रीयांसाठी शुभ श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या साजरी केली जाते. गटारी अमावस्या हा दिवस मनोरंजक सण आणि मेजवानीचा दिवस आहे, कारण या पुढे श्रावण महिन्यात सण-वार, व्रत-उत्सव साजरे केले जातात. यंदा गटारी अमावस्या 8 ऑगस्ट (रविवार) 2021 रोजी पडत आहे. 8 ऑगस्ट रोजी गटारी अमावस्या साजरी केली जाईल. 
 
आषाढी अमावस्या मुहुर्त
आषाढी अमावस्या शनिवार 7 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7.11 मिनिटांनी सुरु होत आहे
आषाढी अमावस्या रविवार 8 ऑगस्ट रोजी 7.19 मिनिटांनी संपणार
 
या उत्सवात मांसाहारी पदार्थांचा समावेश असतो. अनेक हिंदू श्रावण महिन्यात मास-मदिराचे सेवन करणे टाळतात. म्हणूनच श्रावण महिना सुरु होण्याच्या एका दिवसापूर्वी हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो.
 
हिंदू महाराष्ट्रीयन लोकांसाठी श्रावण महिना खूप महत्त्वाचा असतो. बरेच लोक महिनाभर उपवास करतात, ज्यात ते एकभुक्त अर्थात एकदाच आहार ग्रहण करतात. या महिन्यात व्रत नियम, आचार-विचार पाळायचे म्हणून त्यापूर्वी गटारी अमावास्या उत्सव एका प्रकारे पार्टी म्हणून साजरा केला जातो. गटारीमध्ये मित्रमंडळी किंवा नातेवाईकांसोबत मांसाहारी जेवणाची मेजवानी करुन चांगला वेळ घालवण्यात येतो. लोक भव्य मेजवानीचा आनंद घेतात, एकमेकांना भेटतात. अनेकांसाठी गटारी म्हणजे अमर्यादित मद्यपान आणि मांसाहाराचे सेवन असे आहे.
 
एकूण काय तर श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी नॉनव्हेजवर मस्त ताव मारण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
 
आषाढी अमावस्या दीप अमावस्या म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी घरातील दिवे घासून पुसून स्वच्छ आणि लख्ख केले जातात. त्यांची पूजा केली जाते. यापुढे श्रावणातील व्रत वैकल्यांना सुरुवात होते म्हणून दिवे स्वच्छ करण्याची परंपरा असावी.