गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

मक्याचे धिरडे

ND
साहित्य : 2 वाट्या कणीक, 1/2 वाटी दही, 1/2 वाटी दूध, पाववाटी तूप, चवीसाठी मीठ व साखर, 1 चमचा यीस्ट, थोडे पनीर.

कृती : यीस्ट, साखर थोडे दूध एकत्र करा. कणकेत तूप, दही व यीस्ट (भिजवलेले) घालून एकजीव करा. गोळा करून झाकून ठेवा, 10
मिनिटाने फुगून दुप्पट झाल्यावर गोळे करून गॅसवर तवा ठेवून भाजून घ्या.

सारणासाठी : 2 वाट्या मक्याचे दाणे, 1 चमचा तेलल 2 कांदे, 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट, 2 चमचे
कीसलेले पनीर, थोडी कोथिंबीर.

कृती : मक्याचे दाणे थोडे दूध घालून वाफवून घ्या व ठेचा. थोड्या तेलावर आलं-लसूण-मिचरी पेस्ट बारीक चिरलेला कांदा घालून परता.
नंतर मका घालून परतून भाजलेल्या कुलचावर घालून वरून किसलेलं पनीर कोथिंबीर घालून खाण्यास द्यावे.