रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: चेन्नई , मंगळवार, 16 मार्च 2021 (09:59 IST)

भवानी देवी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय तलवारबाज ठरली, तिने रचला इतिहास

Twitter
तामिळनाडूच्या सीए भवानी देवीने असे पराक्रम केले आहेत, जे आजपर्यंत कोणत्याही भारतीय माणसाला मिळवता आले नाही. भवानी देवीने यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी तिकीट मिळवले आहे आणि या खेळांसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय तलवारपटू ठरली आहे. तिच्या आधी कोणत्याही भारतीय ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला नाही.
 
बुडापेस्ट विश्वचषक ही ऑलिम्पिक क्वालिफायिंग स्पर्धा आहे. या स्पर्धेत चेन्नईच्या २७ वर्षीय भवानीने रविवारी शानदार प्रदर्शन करून टोकियो ऑलिम्पिकमध्ये जागा मिळवली. भवानीच्या कामगिरीमुळे संपूर्ण देशातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. आशिया ओशनिया समूहामध्ये ऑलिम्पिकच्या दोन जागा होत्या. जपानच्या तलवारदाराला पहिली जागा मिळाली तर, दुसरी जागा भवानीला मिळाली, असे फेंसिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस बशीर अहमद खान यांनी सांगितले आहे.