सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: खांटी मॅनसिस्क , मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018 (15:10 IST)

जागतिक बुध्दिबळ स्पर्धेतून हरिका बाहेर

येथे खेळल जात असलेल्या जागतिक महिला बुध्दिबळ अजिंक्यपद  स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर डी हरिका ही स्पर्धेबाहेर पडली. त्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. माजी विजेती रशियाची अलेक्झांड्रा कोस्टेनियुक हिने टायब्रेकच्या दुसर्‍या सेटमध्ये हरिकाचा पराभव केला. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी 25 मिनिटे होती. हरिकाने पहिला गेम काळ्या  सोंगट्यांसह खेळताना 10 मिनिटात गमावला. त्यानंतर ती या सामन्यात पुनरागमन करू शकली नाही. भारताच्या आशा तिच्यावर केंद्रित झाल्या होत्या.