शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 30 ऑगस्ट 2021 (16:33 IST)

Tokyo Paralympic : थाळीफेकपटू विनोद कुमार यांच्याकडून कांस्यपदक परत घेणार

टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये डिस्कस थ्रोमध्ये कांस्य पदक जिंकणारे भारतीय खेळाडू विनोद कुमार यांचं पदक काढून घेतलं जाणार आहे.
 
डिस्कस थ्रो स्पर्धेत शारीरिक अक्षमता (डिसॅबिलिटी) निर्धारण चौकशीत विनोद कुणार 'अयोग्य' आढळले.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) ने सांगितलं होतं की, 19.91 मीटर डिस्कस फेकून विनोद कुमार यांनी आशियात नवीन विक्रमाची नोंद केलीय.
 
अवनी लेखरा : पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय नेमबाज
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखराने 'सुवर्ण' कामगिरी केली आहे. 10 मीटर्स एअर रायफलमध्ये अवनीने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे.
19 वर्षीय अवनी प्ररालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. अवनीने संयम राखत 249.6 पॉईंटसह विश्व विक्रमाची बरोबरी केली आणि पदकही जिंकलं आहे.
 
अंतिम सामन्यात अव्वल कामगिरी
चीनच्या कुइपिंग झांगने 248.9 पॉईंट मिळवत रजत पदक जिकलं आणि यूक्रेनच्या इरियाना शेकेत्निकने कांस्य पदक जिंकलं.
अवनी लेखराने सामन्याची सुरुवात वेगवान केली. तिने 10 पॉईंटसह आपल्या खेळात सातत्य राखलं.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीत केवळ दोन वेळेला अवनीला 10 पॉईंटपेक्षा कमी स्कोअर करता आला. यामुळे ती पहल्या फेरीत दुसऱ्या क्रमांकावर होती.
 
नॉक आऊट राऊंडमध्ये अवनी अव्वल राहिली आणि तिने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर चांगली मात केली. अखेर 249.6 पॉईंटसह अवनीने सामना जिंकला.
यापूर्वी पात्रता फेरीत 621.7 स्कोर करत अवनी सातव्या क्रमांकावर राहिली.