बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 23 मार्च 2019 (17:03 IST)

स्पेशल ओलंपिक वर्ल्ड समर गेम्समध्ये भारताने 368 पदक जिंकले

संयुक्त अरब अमीरात मध्ये भारताने 14 ते 21 मार्च दरम्यान, स्पेशल ओलंपिक वर्ल्ड समर गेम्समध्ये 85 सुवर्णपदकांसह 368 पदक जिंकले. 
 
भारतीय संघात 284 खेळाडू सामिल होते ज्यांनी 154 रजत आणि 129 कांस्य पदक देखील जिंकले. इंडियन पॉवरलिफ्टर्सने 20 सुवर्ण, 33 रजत आणि 43 कांस्यपदक जिंकले. रोलर स्केटिंगमध्ये भारताने 13 सुवर्ण, 20 रजत आणि 16 कांस्यपदकांसह एकूण 49 पदके मिळविली. सायकलिंग मध्ये भारताने 11 सुवर्णपदकांसह 45 पदक जिंकले. त्याच वेळी ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताने 5 सुवर्ण, 24 रजत आणि 10 कास्य पदक मिळविले.