बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 जुलै 2022 (19:56 IST)

Neeraj Chopra: नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये भाल्याने केले चमत्कार, १५ दिवसांत दुसऱ्यांदा मोडला राष्ट्रीय विक्रम

niraj chopra
टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये शानदार थ्रो मारत पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे.
 
टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने डायमंड लीगमध्ये शानदार थ्रो मारत पुन्हा एकदा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. स्टॉकहोममध्ये नीरजने पहिल्याच प्रयत्नात 89.94 मीटर फेक केली. त्याने स्वतःच्या राष्ट्रीय विक्रमात सुधारणा केली आहे. याआधी 14 जून रोजी नीरजने पावे नुर्मी गेम्समध्ये 89.30 मीटर भालाफेक केली होती.

भारताच्या या स्टार भालाफेकपटूने आतापर्यंत सात वेळा डायमंड लीगमध्ये भाग घेतला आहे. 2017 मध्ये तीन वेळा आणि 2018 मध्ये चार वेळा सहभाग घेतला. त्यानंतर त्याला एकही पदक जिंकता आले नाही. दोनदा त्याला चौथे स्थान मिळाले.
 
पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी नीरजसाठी ही सर्वात मोठी स्पर्धा आहे. या सामन्यात टोकियो ऑलिम्पिकमधील पदक विजेते तिन्ही खेळाडू रिंगणात होते. सध्या सर्वाधिक वेळा 900 मीटरचे अंतर पार करणारा जर्मनीचा जोहान्स वेटर दुखापतीमुळे यावेळी मैदानात उतरला नाही.