1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (15:26 IST)

सिंधूने रचला इतिहास एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत, देशातील पहिली महिला खेळाडू

बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने इतिहास रचला असून एशियन गेम्सच्या जकार्ता येथे सुरू असलेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. असे करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. यामुळे देशाला सुवर्ण प्राप्त होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. पीव्ही सिंधूने जपानच्या अॅकने यामागुची हिला २१-१७, १५-२१, २१-१० अशी मात दिली आहे. तिची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली असून याच क्रीडा प्रकारात सायना नेहवालने देखील कांस्य पदक पटकावून इतिहास रचला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या बॅडमिंटनच्या महिला एकेरीत पीव्ही सिंधूच्या रुपाने पहिल्यांदाच भारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. सायना नेहवाल उपांत्य फेरीत पराभूत झाली असली तरी बॅडमिंटन महिला एकेरीत देशाला  कांस्य पदक पटकवून देणारी ती पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. त्यामुळे सिंधू आणि सायना या दोघींनी देशाचे नाव जगात उज्ज्वल केले आहे.