पंतप्रधान उत्तराखंडमधील 4 जिल्ह्यांमध्ये व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड विधानसभेसाठी चार निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. शुक्रवारी पंतप्रधान उत्तराखंडमधील चार जिल्ह्यांतील एक लाखाहून अधिक कामगारांच्या रॅलीला व्हच्युअली संबोधित करणार आहेत.
उत्तराखंडमधील अल्मोडा, बागेश्वर, चंपावत आणि पिथौरागढ या 4 जिल्ह्यांमध्ये या रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे. उल्लेखनीय आहे की उत्तराखंडमध्ये 70 सदस्यीय विधानसभेसाठी 14 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. अशात आयोगाने सर्व प्रकारच्या रॅली आणि रोड शोवर अंशत: बंदी घातली आहे.