रविवार, 26 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 26 सप्टेंबर 2014 (10:06 IST)

भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युत अखेर संपुष्टात

भाजप-शिवसेनेची 25 वर्षांची युत अखेर संपुष्टात

भाजप आणि शिवसेनेची 25 वर्षेंच्या मैत्री आज घटस्थापनेच्या दिवशी संपुष्टात आल्याचे भाजपने पत्रकार परिषदेत जाहीर केले. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या जागावाटपावरून अखेर चर्चेचा शेवट दोन्ही पक्षांच्या घटस्‍फोटाने झाला. शिवसेनेसोबतची युती तुटल्याचे जाहीर करून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

एकनाथ खडसे यांनी प्रास्तविक मांडताना 1989 मध्ये भाजप-सेनेची युती अस्तित्त्वात आल्याचे सांगितले. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, भाजपचे दिवंगत ज्येष्‍ठ नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी भाजप आणि सेनेची युती घडवून आणली होती. परंतु शिवसेना केवळ मुख्यमंत्रीपदाच्या भोवती फिरत असल्याने ठोस तोडगा निघाला नाही. भाजपे अनेकदा पुढाकार घेवून चर्चेची तयारी दर्शवली. मात्र शिवसेने शेवटपर्यंत 151 जागांचा हट्ट सोडला नाही. परिणामी आज सेनेसोबत युती संपुष्टात आल्याचे फडणवीस आणि खडसे यांनी सांगितले. यावेळी आमदार पंकजा मुंडे, विनोद तावडे, महादेव जानकर उपस्थित होते.

घटक पक्षांवर कोणताही अन्याय होणार नसल्याचे यावेळी फडणवीसांनी सांगितले. युती तुटली असली तरी महायुती कायम राहिल. यासाठी घटक पक्षांनासोबत घेऊन  निवडणूक लढण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे. यासाठी राजू शेट्टी, रामदास आठवलेंशी चर्चा केली जाणार असल्याचे फडणवीस म्हणाले.