सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

विठोबाशी निगडित कथा

विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. त्याचा अवतार हा गयासुर नावाच्या अर्धम संस्थापक, भ्रष्ट राक्षसांचा समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगांत झाला होता. त्यावेळी गयासुर अरीने सत्यश्रेष्ठ हिंदू धर्माचा नाश करण्यासाठी देव गणांना भूलवण्याचे तथा गो-ब्राम्हण हत्येचे अखंड सत्र चालवले होते. यास्तव श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या आज्ञाने श्रीहरीने बौध्य नामे अवतार घेऊन गयासुराला अग्नीकुंडात जाळून भस्म केले होते. नंतर त्याचा परमभक्त जो कुंडलिक मुनी त्यास भेटून स्व स्वरूप दाखविले होते आणि मातापित्याची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त 13 ते 17 व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. हरिनी कानडी लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्त्रोत्र रचिले आहे. विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशी व प्रबोधिनी एकादशी आहेत.