गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. वर्ल्डकप इतिहास
Written By
Last Modified: शनिवार, 31 जानेवारी 2015 (15:36 IST)

जेव्हा द्रविड गांगुलीने वर्ल्ड कपात इतिहास घडवला

1999चा वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये खेळण्यात आला होता. भारतीय संघ या अगोदर इंग्लंडमध्ये झालेले विश्वकप 1983चे चॅम्पियन राहून चुकले होते. भारतीय संघाला 1999च्या विश्वकपापासून फार उमेद होती. पण विश्वकपाच्या सुरुवातीत भारतीय संघाची सुरुवात फारच निराशाजनक झाली होती, भारताने साऊथ आफ्रिकेच्या विरुद्ध मॅच गमवला आणि नंतर भारतीय संघाला एका सामन्यात 3 धावांनी पराभूत व्हावे लागले.  
 
भारताने केन्याच्या विरुद्ध सामना जिंकला पण हा विजयाद्वारे भारताचे विश्वकपाच्या क्वालीफाइंग राउंडामध्ये पोहोचणे पुरेसे नव्हते. भारतासमोर विश्वकपाचे दोन सामने श्रीलंका आणि इंग्लंडच्या विरुद्ध उरलेले होते. या सामन्यात जिंकणे फारच गरजेचे होते. श्रीलंकेच्या विरुद्ध या सामन्यात भारत आधी फलंदाजी करण्यासाठी उतरला.  
 
भारताची सुरुवात फारच खराब राहिली आणि भारताने सदगोपन रमेशच्या रूपात फक्त सहा धावांच्या स्कोअरवर आपला विकेट गमवला. विकेट गमवल्यानंतर राहुल द्रविड गांगुलीचा साथ देण्यासाठी मैदानात आला आणि दोघांनी मिळून भारतीय डावाला हळू हळू पुढे वाढवले. दोघांनी या डावात 318 धावांची भागीदारी केली.  
 
भारताने 373 धावा काढत श्रीलंकेला या सामन्यात पराभूत केले. गांगुलीने या सामन्यात 158 चेंडूंवर 183 धावा काढल्या आणि द्रविडाने या सामन्यात 145 धावांची उत्तम खेळी खेळली. दोघांनी 318 धावांची भागीदारी आजपर्यंत विश्वकपाची सर्वात मोठी भागीदारी आहे.