शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योग सल्ला
Written By वेबदुनिया|

योगा मसाज आणि बाथ

WD
योगा मसाज आणि स्नानाचे बरेचसे चरण असतात. आठवड्यातून योगानुसार मसाज आणि स्नान केल्याने शरीर एकदा परत ताजेतवाने होऊन जाते. हे केल्याने व्यक्तीचा थकवा, चिंता, रोग आदी दूर होण्यास मदत मिळते. तणाव आणि प्रदूषण असलेल्या वातावरणातून निघून व्यक्ती सामान्य आणि ताजेतवाने होण्याची इच्छा बाळगतो म्हणून आता योगा रिजॉर्टांमध्ये आजकाल याचे प्रचलन वाढले आहे, पण हे तुम्ही घरीसुद्धा करू शकता.

योगा मसाज : चेहऱ्यावर हलक्या हाताने क्रीम किंवा तेल लावून हळू हळू मॉलिश केली पाहिजे. याच प्रमाणे हाता- पायांचे बोट, डोकं, पाय, खांदे, कान, पाठ आणि पोटाची मॉलिश करावी. शरीराच्या सर्व अवयवांना चांगल्याप्रकारे हलक्या हाताने दाब द्यावा ज्याने थांबलेली ऊर्जा मुक्त होऊन त्या अंगांच्या शिरांपर्यंत पोहचेल आणि रक्ताचे पून : संचार होण्यास मदत मिळेल. तसे तर योगा मासाज जास्त व्यापक प्रमाणात करू शकतो. यात संपूर्ण अंगावर घर्षण, दडणं, थपकी, कंपन आणि संधी प्रसारणच्या रित्याने मसाज केला जातो.

योगा स्नान : सुगंध, स्पर्श, प्रकाश आणि तेलाचे औषधीय मिश्रण सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक विकारांना दूर करतो. याला आयुर्वेदिक किंवा स्पा स्नान देखील म्हणतात. या स्नानामध्ये बरेचसे चरण असतात. या चरणांमध्ये अभ्यंगम, शिरोधारा, नास्यम, स्वेदम आणि लेपण इत्यादी प्रयोग उपयोगात आणतात. या अगोदर तुम्ही पंचकर्मसुद्धा करू. पंचकर्म अर्थात पाच प्रकारच्या कार्यांद्वारे शरीराची शुद्धी करणे जसे - वमन, विरेचन, बस्ती-अनुवासन, बस्ती-आस्थापन आणि नस्य.

फायदे : योगा स्नानाने स्नायू पुष्ट होतात, दृष्टी वाढते, झोप न लागण्याची समस्या दूर होते. शरीरात शक्तीचा प्रवाह होऊन शरीराचा रंग सोन्यासारखा चमकतो. योगा मसाज किंवा स्नानाद्वारे रक्त संचारणं व्यवस्थित प्रकारे होतो. याने तणाव आणि डिप्रेशन पण दूर होतो. बऱ्याच रोगांवर योग चिकित्सक हे करण्याची सल्ला देतात.

सरळ आहे हे आसन : या व्यतिरिक्त तुम्ही खाली दिलेले बारा आसनांना नियमितपणे करू शकता. हे केल्याने कुठल्याही प्रकारचे आजार तुमच्या जवळ येत नाही व तुम्ही तुमचे तारुण्य जपून ठेवू शकता. हे बारा आसन म्हणजे - पद्मासन, अर्धमत्स्येंद्रासन, सर्वांगासन, हलासन, धनुरासन, पश्चिमोत्तनासन, मयुरासन, भद्रासन, मुद्रासन, भुजंगासन, चंद्रासन आणि शीर्षासन.