शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. योग
  4. »
  5. योग सल्ला
Written By वेबदुनिया|

योग म्हणजे काय?

WD
योग हा शब्द मुळात संस्कृत भाषेतून आलेला आहे. संस्कृतच्या युज आणि योक या दोन शब्दांनी मिळून योग हा शब्द तयार झाला आहे. युजचा अर्थ जोडणे, बांधणे असा होतो तर योकचा अर्थ एकाग्रचित्त, मनाची एकाग्रता, विचार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे असा होतो.

योग म्हणजे शरीराचे अवयव, मनातील भावना आणि अध्यात्म यांचा समन्वय होय. योग आपल्या जीवनातील मानसिक ताण-तणाव कमी करून आपल्या शरीरातील सर्व नाड्यांचे शुद्धीकरण करतो. योग ही आध्यात्मिक वाट असून त्या वाटेवर चालून आपण आपले ध्येय गाठू शकतो. अर्थातच, ते ध्येय गाठण्यासाठी त्या वाटेवरचे नियम पाळावेच लागतील.

सात्त्विक जीवनशैली, संस्कारक्षम नियंत्रित मन आणि सात्त्विक विचार या तिघांचा एकत्रित परिणाम आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळेच परिमाण देतो. जो मनुष्य या तीनही नियमांचा विचारपूर्वक उपयोग करतो, अर्थातच त्याचा स्वत:च्या मनावर पूर्णत: ताबा असतो. एकदा का त्याचे मन शांत झाले, की शरीरसुध्दा पूर्णत: त्याच्या ताब्यात असते.

योग करण्याने सात्त्विक वैचारिक पातळीचा उच्चांक गाठला जातो, जो त्याच्या बदललेल्या जीवनशैलीत उठून दिसतो.

योगाचे मूळ
ND
योगाचे मूळ दोन गोष्टींमध्ये सामावलेले असते. एक शारीरिक आणि दुसरे आध्यात्मिक. शारीरिक मुळात आसन, क्रिया, आणि प्राणायाम यांचा समावेश असतो. या सर्वांचा योग्य अभ्यास शरीरास योग्य आध्यात्मिक यश दोतो. योग गुरू या सर्वांचे एक जिवंत उदाहरण आहे.

या विशेष सदराद्वारे आम्ही आपणास एकामागोमाग एक तीस आसनांची माहिती देणार आहोत. प्रत्येक आठवड्यात तुम्हाला एका नवीन आसनाची माहिती दिली जाईल. चला तर मग एका आरोग्यदायी आणि तंदुरुस्त जगाच्या दिशेने प्रवास सुरू करू या.