शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 20 सप्टेंबर 2020 (15:57 IST)

कोरोना व्हायरस : नियमानं प्राणायाम करा आणि कोरोना टाळा

कोरोना व्हायरस आज एक फार मोठी समस्या बनली आहे. या विषाणूशी लढण्यासाठी आज संपूर्ण देश सज्ज आहे. गरज आहे ती फक्त स्वतःची काळजी घेण्याची आणि जागरूकतेची. कोरोना विषाणू आपल्या श्वसन प्रणाली वर दुष्परिणाम टाकतो. 
 
तसंच, आज सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की जर आपण आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकलो किंवा बळकट करतो आणि त्याचसह आपली श्वसन प्रणाली सक्रिय ठेवली तर कोणतेही आजार हानिकारक ठरु शकत नाही. हे आपण काही योगासनाद्वारे सहजरित्या सक्रिय करू शकतो. 
 
या सर्व बाबी लक्षात घेउन आम्ही फिजिओथेरपिस्ट आणि योग प्रशिक्षक डॉ.चंद्रशेखर विश्वकर्मा यांच्यासोबत चर्चा केली. 
 
चला तर मग जाणून घ्या तज्ञांचा सल्ला.. 
 
डॉ. चंद्रशेखर विश्वकर्मा सांगतात की रोगांविरुद्ध लढण्याची क्षमता वाढविण्यासाठी आपण आपल्या अंतःस्रावी ग्रंथीना सक्रिय ठेवणं महत्वाचं आहे. विशेषतः थायमस ग्रंथींना. ही ग्रंथी आपल्याला हृदयाजवळ दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये असते. 
 
या ग्रंथीचे मुख्य कार्य टी -सेल किंवा पेशी किंवा T-lymphocytes तयार करणं आहे, जी शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेला टिकवून ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते आणि या साठी सूर्यनमस्काराचे नियमानं सराव करणं आवश्यक आहे. 
 
प्राणायाम करताना अनुलोम-विलोम, भ्रस्त्रिका आणि कपालभातीचा सराव करणं आवश्यक आहे. 
 
'ॐ' चे उच्चार किमान 5 मिनिटे तरी नियमानं करावं. जर का 
 
आपण 'ॐ' चा उच्चार नियमानं करतो त्यामुळे आपली थायमस आणि पिट्युटरी ग्रंथी किंवा पियुष ग्रंथी देखील म्हणतो ती बळकट होते.