रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (16:03 IST)

जेवण झाल्यानंतर 2 योगासन करा, पाचनतंत्र चांगले राहिल, गॅस, एसिडिटी पासून आराम मिळेल

हे 2 योगासन दूर करतील बद्धकोष्ठता, अपचन, गॅस, एसिडिटी 
अनेक लोकांना बद्धकोष्ठता, अपचन, गॅस, एसिडिटीची समस्या असते. त्यापासून आराम मिळण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत योगचे 3 नियम आणि 2 आसन ज्यांना अवलंबवल्याने तुमचे पाचन तंत्र सुरळीत होईल. 
 
या 3 योग नियमांचे पालन करा 
जेवतांना अन्न दाताने चांगले चावून खा.
जेवण झाल्यानंतर एक तासाने पाणी प्या.
जास्त मसालेदार किंवा तेलकट जेवण करू नये.   
 
1. पाहिले आसन वज्रासन विधि- खाली बसल्यावर दोन्ही पाय समोर सरळ ठेवा . उजव्या हाताने उजव्या पायाचा पंजा पकडून गुडघा वाकवून टाच कुल्ह्याच्या खाली ठेवा. तळहातांना गुरूडघ्यावर ठेवा . पाठीचा कणा आणि मान सरळ ठेऊन समोर बघा. या स्थितीत कमीतकमी तीन मिनिट बसा . मग श्वास सोडून पुन्हा पूर्व स्थितीत यावे.  हे एक आसन आहे जे जेवण झाल्यानंतर लगेच केले जाऊ शकते. यामुळे जेवण पचायला मदत होते. 
 
2. दूसरे आसान उदारकर्षण विधि- सगळ्यात आधी दोन्ही पंजा वर बसून  मोठा श्वास घेणे आणि मग उजव्या गुडघ्याला जमिनीवर टेकवा आणि डाव्या गुडघ्याला वरती छातीजवळ आणा . दोन्ही गुडघे आपल्या तळहातांनी झाकून घ्या  उजव्या गुडघ्याला जमिनीवर टेकवतांना लक्ष दया की तुमचा पंजा जमिनीवर असावा  पण टाच हवेत असावी. अशा स्थितीत पूर्ण शरीर मान सकट डाव्या बाजूला फिरवा. अशा स्थितीत उजवा गुडघा डाव्या पंजाला स्पर्श करेल आता उजव्या पायाच्या टाचेला बघा  एक ते दोन मिनिट या अवस्थेत रहाणे मग सामान्य अवस्थेत परत येतांना श्वास पूर्णता बाहेर असावा. या आसनला झोपुन केले जाऊ शकते. 

Edited By- Dhanashri Naik