बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (18:27 IST)

हे 10 नियम अवलंबवा आजार कधी जवळ येणार नाही

आपण हे 10 नियम अवलंबवले तर आपल्या जवळ आजार कधीच येणार नाही. आपण आयुष्यभर निरोगी राहाल. या पूर्वी 3 गोष्टी पाळाव्यात. 
 
1  पेय पदार्थांचा त्याग करणे - चहा,कॉफी, कोल्ड्रिंक सारखे पेय पदार्थ आयुष्यात कधीही घेऊ नका.
 
2 हे खाद्य पदार्थ घेऊ नका-आहारात मांस,साखर,तेल,मीठ,मैदा,आरारूट, गहू,हरभराडाळीचे पीठ,वांग, फ़णस आणि  या पासून बनलेल्या पदार्थांना खाऊ नका.नैसर्गिक साखर घ्या,सेंधव  मिठाचे सेवन करा. नैसर्गिक तेल वापरा, गव्हाच्या ऐवजी ज्वारी,बाजरा,जवस,आणि मकई वापरा.
 
3 जीवनशैली बदला- आपल्या जुन्या जीवनशैली ला बदला. जसे की रात्री उशिरा झोपणे,सकाळी उशिरा उठणे,जेवताना टीव्ही बघणे, मद्यपान करणे,धूम्रपान करणे इत्यादी. 
 
हे 10 नियम अवलंबवा -
 
1 उपवास करा- उपवास किमान 16 तासाचा करा. रात्री जेवल्यावर 16 तास काहीही खाऊ नका.
 
2 पेय पदार्थ घ्या- आठवड्यातून किमान 1 वेळा तरी एक ग्लास लिंबू पाणी सोडा घालून प्यावे.या शिवाय आपण फळाचे ज्यूस देखील घेऊ शकता. 
 
3 सूर्य नमस्कार- दररोज योगासन करणे शक्य नसेल तर सूर्य नमस्कार करा.
 
4 आहार-आहारात दही,सॅलड,डाळिंब, हिरव्या पालेभाज्या,लसूण, बीन्स,आणि सुकेमेवे ह्याचे सेवन करावे. जेवण्यानंतर पाणी पियू नये. 
 
5 उन्हात बसा- दररोज सकाळी सूर्याच्या प्रकाशात बसा, या मुळे सर्व पोषक घटक,आणि व्हिटॅमिन मिळतात. 
 
6 तुळशीचे सेवन- दररोज किमान 4 तरी तुळशीची पाने घ्यावी. 
 
7 भांडी- पितळ्याच्या भांडीत जेवण करणे आणि तांब्याच्या भांडीतून पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे .
 
8 शुद्ध हवा- ज्या प्रमाणे आपल्या शरीराला शुद्ध अन्न आणि पाण्याची आवश्यकता असते त्याच प्रमाणे शरीराला शुद्ध हवेची गरज असते. परंतु सध्याच्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुद्ध हवा मिळणे शक्य नाही.सध्या मास्क वापरा. प्रदूषणापासून स्वतःला वाचवा. सकाळी प्राणायाम करा.प्राणायाम केल्याने फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. या मुळे आपण दीर्घ काळ आयुष्य जगता. 
 
9 तणाव घेऊ नका- हे सर्व नियम अवलंबवले आहे परंतु आयुष्यात तणाव, काळजी, आणि मानसिक विकार असतील तर सगळे व्यर्थ आहे. तणाव माणसाला शारीरिक दृष्टया कमकुवत आणि आजारी करतात. हे दूर करण्यासाठी किमान 10 मिनिटे तरी ध्यान करा. आपण ध्यान सूर्य नमस्कार करताना देखील करू शकता. 
 
10 वास्तू- जीवनात ग्रह-नक्षत्राचा प्रभाव पडो किंवा ना पडो परंतु, आपण जिथे वास्तव्यास आहात तिथल्या वातावरणाचा प्रभाव अवश्य पडतो. काही असे घर असतात जे उन्ह्याळ्यात थंडावा देतात आणि हिवाळ्यात उष्णता देतात. आपल्याला वातानुकूलित वातावरणात राहण्याची सवय असेल तर ही आपल्याला शारीरिक दृष्टया कमकुवत करते.दुसरे असे की घराच्या आत किंवा घराच्या बाहेर कसे झाडे आहेत किंवा घराची दिशा आणि दशा कशी आहे हे निश्चितपणे तपासा.