शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योगासन
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (20:20 IST)

शरीर तंदुरुस्त आणि मन शांत ठेवण्यासाठी सकाळी- सकाळी हे योगासन करावे

sthirata shakti yoga benefits
सकाळची वेळ आरोग्यासाठी उत्तम असते कारण यावेळी ताजी हवा सुरु असल्यामुळे मन शांत राहतं. सकाळच्या वेळी मनात सकारात्मक विचार येतात आणि दिवसाच्या सुरुवातीला आपल्या मूडप्रमाणे पूर्ण दिवस अवलंबून असतो. जर सुरुवात चांगली असेल तर मन आणि मूड दिवसभर चांगला राहतं. उत्तम आरोग्यासाठी सकाळची सूर्यकिरणे देखील आवश्यक असल्याचे सांगितलं जातं.
 
सकाळी व्यायाम केल्याने शरीराला सर्वाधिक फायदा होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. सकाळी अर्धात तास योगासन केल्याने शरीर निरोगी आणि मन सक्रिय राहण्यास मदत होते.
 
सर्वात आधी Warm-Up होणे आवश्यक आहे-
कोणताही व्यायाम किंवा योगा करण्यापूर्वी वार्मअप करणे महत्त्वाचे असते. याने शरीर पुढील हालचालींसाठी तयार होतं. यासाठी शरीराच्या प्रत्येक अंगाची सुरुवाती हालचाल करा. यामुळे स्नायू ताणले जातील शरीर व्यायामासाठी तयार होईल.
 
या नंतर शरीराला Balanced Pose ने संतुलित करा-
या आसनाचा सराव करण्यासाठी सरळ उभे रहा.
कंबरेच्या दोन्ही बाजूला हात ठेवूून तळवे आतील बाजूस करा चेहरा पुढच्या दिशेला असावा.
काही वेळ या आसनात राहा.
 
नंतर आपण Tree Pose चा सराव करु शकता-
यासाठी सरळ उभे राहा. पाय जमिनीवरून उचलूून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. तळवे प्रणामाच्या मुद्रेत ठेवा. तेव्हा कंबर सरळ ठेवा आणि संतुलन असू द्या. हेच दुसऱ्या पायाने पुन्हा करा.
 
तसेच दैनंदिन आरोग्य आणि फिटनेससाठी सर्वोत्तम आसन म्हणजे सूर्यनमस्कार घालणे. सकाळी उठून सूर्यनमस्कारचा सराव केल्याने शरीर आणि मन मोकळे होते.