सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By
Last Updated : शनिवार, 22 एप्रिल 2023 (15:28 IST)

अक्षय तृतीया 2023 शुभेच्छा Akshay Tritiya 2023 Wishes in Marathi

akshay tritiya
चांगल्या गोष्टींचा ओघ सदा वाटतो अक्षय राहावा,
परमेश्वराच्या कृपेचा ही अक्षय हात असावा,
अक्षय सत्कर्म हातून प्रत्येकाच्या घडावं,
एक पवित्र मन ही प्रत्येकाने अक्षय जपावं,
डोळ्यात ममता अक्षय दिसावी माणसाच्या,
परोपकारीच भाषा अक्षय असावी मुखात सर्वांच्या,
परस्त्री माते समान ही भावनाच मनी असावी,
नराधमांना शिक्षा द्यायला दुर्गा अक्षय हृदयात जगवावी!
....अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा!
..अश्विनी थत्ते.