सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अक्षय तृतीया
Written By
Last Updated : सोमवार, 2 मे 2022 (23:17 IST)

Akshaya Tritiya Wishes in Marathi :अक्षय तृतीया मराठी शुभेच्छा

akshay tritiya
तुमच्या घरावर होवो धनाची बरसात…
लक्ष्मीचा असो वास…
संकटाचा होवो नाश…
शांतीचा असो वास…
अक्षय तृतीयाच्या  शुभेच्छा!
 
धन लक्ष्मी येवो घरी,
लक्ष्मीची कृपादृष्टी असो त्यावरी
करुन सोन्याची खरेदी
करु अक्षय्य तृतीया साजरी
अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा!
 
दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
असा असो तुमचा अक्षय तृतीया सण,
अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा…!
 
लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसो..
प्रत्येक जण तुमच्याकडून लोन घेण्यासाठी येवो..
देव देईल तुम्हाला इतके धन की गायब होईल घरातली चिल्लर…
अक्षय्य तृतीया शुभेच्छा..!
 
अक्षय राहो सुख तुमचे…
अक्षय राहो धन तुमचे…
अक्षय राहो प्रेम तुमचे…
अक्षय राहो आरोग्य तुमचे.
या शुभ दिवसाच्या शुभ शुभेच्छा!
 
माता लक्ष्मीचा हात असो,
सरस्वतीची साथ असो,
गणपती बाप्पाचा वास असो,
आणि माता दुर्गाचा आशिर्वाद
असो तुमच्या जीवनात प्रकाशच प्रकाश होवो,
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा!
 
अक्षय राहो धनसंपदा,
अक्षय राहो शांती..
अक्षय राहो मनामनातील,
प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय्य तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!
 
सोन्याच्या झळाळीप्रमाणे
उजळून जावो आयुष्य तुमचे
सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी
हेच मागणे ईश्वराकडे आमचे
अक्षय्य तृतीयाच्या शुभेच्छा!
 
 
कंठातून गाण्यात आणि
गाण्यातून अंतरंगात जे नेतात
ते सूर..... अक्षय 
 
अनुभवातून वाक्यात आणि
वाक्यातून डोळ्यात जी चमकते
ती बुद्धी... अक्षय 
 
वर्दीतून निश्चयात आणि
निश्चयातून सीमेवर उभे असते
ते धैर्य.... अक्षय 
 
एकांतातून शांततेत आणि
शांततेतून आनंदात जो लाभतो
तो आत्मविश्वास... अक्षय 
 
सुयशातून सातत्यात आणि
सातत्यातून ऐश्वर्यात जी बहरते
ती नम्रता... अक्षय 
 
स्पर्शातून आधारात आणि
आधारातून अश्रुत जी ओघळते
ती माया.... अक्षय 
 
हृदयातून गालावर आणि
गालावरून स्मितेत जे तरंगते
ते प्रेम... अक्षय 
 
इच्छेतून हक्कात आणि
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री... अक्षय 
 
स्मृतितून कृतित आणि
कृतितून समाधानात जी दिसते
ती जाणीव.... अक्षय 
 
मनातून ओठावर आणि
ओठावरून पुन्हा मनात जाते
ती आठवण..... अक्षय 
 
अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा