शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. एशिया कप 2022
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (19:41 IST)

AFG vs BAN Asia Cup 2022 Live: बांगलादेशची फलंदाजी सुरू, मोहम्मद नईम आणि अनामूल हक क्रीजवर

AFG vs BAN
AFG vs BAN Asia Cup 2022 Live: आशिया कप 2022 (Asia Cup 2022)चा तिसरा सामना मंगळवारी अफगाणिस्तान आणि बांगलादेश (AFG vs BAN)यांच्यात खेळला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनचा टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा 100 वा सामना आहे.शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाला विजयासह सुपर 4 मध्ये पोहोचायचे आहे.दुसरीकडे, शाकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघ या स्पर्धेत आपला पहिला सामना खेळत असून या फॉर्मेटमध्ये आपला विक्रम सुधारू इच्छित आहे.

अफगाणिस्तान प्लेइंग इलेव्हन:हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला झद्रान, करीम जनात, मोहम्मद नबी (क), रशीद खान, अजमातुल्ला ओमरझाई, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान, फझलहक फारुकी. 

बांगलादेश प्लेइंग इलेव्हन:मोहम्मद नईम, अनामूल हक, शकीब अल हसन (क), अफिफ हुसेन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मोसाद्देक हुसेन, महमुदुल्लाह, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.