गुरूवार, 23 मार्च 2023
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2021
Written By
Last Modified बुधवार, 16 डिसेंबर 2020 (12:57 IST)

मीन राशी भविष्य 2021

मीन म्हणजे मासे म्हणजेच पाण्याचे घटक असणारी ही रास. या राशीचे लोक मासां प्रमाणेच मऊ आणि नाजूक असतात. हे वर्ष 2021 या राशींच्या लोकांकडून खूप परिश्रम मागत आहे. या वर्षात या राशीच्या लोकांसाठी मोठे संकट तर नाही पण सरासरीच्या दृष्टीने मध्यम स्थिती असेल. धनार्जनासाठी ग्रहांचे साधारण चिन्हे दिसत आहे. प्रेमाच्या दृष्टीने आशेचा किरणां दिसत आहे. करिअरच्या दृष्टीने बघता स्थिती साधारण असेल. पण आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष उत्कृष्ट असेल. या राशीच्या लोकांना संयमाने आणि शांतीने राहावे लागेल. आयुष्यात चढ-उतार राहतील. एखाद्या प्रिय व्यक्तीपासून दूर होण्याची शक्यता आहे. 
 
आयुष्यात अडथळे आहेत पण मनापासून प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळेल. परदेश जाण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी हे वर्ष आशादायक नाही, थोडा काळ जाऊ द्या, पण वर्ष 2022 मध्ये नक्की यश मिळेल. प्रवासाचे योग येतील. जे या राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरतील. कुटुंबासमवेत सुंदर वेळ घालवाल. बऱ्याच कार्यक्रमात भाग घेण्याची संधी मिळेल. कामात मन लावा अन्यथा नोकरी गमावून बसाल. चला तर मग जाणून घेऊ या की  राशींच्या लोकांसाठी रोमांस, धन, करिअर आणि आरोग्यासाठी कसे असेल हे वर्ष 2021.  
 
रोमांस साठी कसे असणार हे वर्ष 2021 :
रोमांसच्या दृष्टीने मीन राशीच्या लोकांसाठी हे 2021 वर्ष मिश्रित फळ देणारे आहे. प्रेम करणारे विवाह बंधनात अडकतील. विवाहित लोकांच्या प्रेमात अडथळे येतील. या वर्षी मीन राशीचे लोक आपल्या मनातले जोडीदाराला सांगतील.ऑगस्ट आणि सेप्टेंबरमध्ये प्रेम बहरेल.एखाद्या प्रेम संबंधात असाल तर आपलं नातं अधिक दृढ होईल. लग्नाच्या वेडीत अडकण्याची दाट शक्यता आहे. वर्ष 2021 मध्ये या राशीच्या लोकांचे सुरुवातीचे काही महिने कमकुवत असतील. तणाव वाढेल, नात्यात विभक्तता होऊ शकते, संयम बाळगा. मे महिन्यात पुन्हा प्रेमाचे किरणं चमकतील. आनंदी व्हाल.या राशीच्या लोकांना सल्ला देण्यात येत आहे की बोलताना शब्द जपून वापरा अन्यथा आपलं बोलणं कोणाला दुखावू शकतं त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाईल. सर्व खेळ बोलण्याचे आहे. शब्दांना नियंत्रित केले तर सर्व काही चांगले होईल अन्यथा नात्यात दुरावा येईल.   
 
आर्थिक व्यवहारासाठी कसे असणार हे वर्ष 2021 :
वर्ष 2021 ची सुरुवात तर चांगली दिसत आहे आणि निकाल देखील अपेक्षित मिळतील. नशीब चमकेल आपल्याला धनप्राप्ती होईल. वर्षाच्या मध्यकाळात लक्ष द्यावे लागणार. पैसे कुठेही अडकू शकतात त्यासाठी संघर्ष करावे लागेल. वर्षांतांत  ते पैसे मिळतील. त्यामुळे आनंदी व्हाल आणि आर्थिक चणचण संपेल. कर्जमुक्तीची शक्यता कमी असेल. खर्च वाढतील. या वर्षी बचत होणार नाही. योग्य दिशेने प्रयत्न केले तर आपल्या कठीण परिश्रमाने ग्रहांची स्थिती पालटेल. आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा.
 
करिअर साठी कसे असणार हे वर्ष 2021 :
2021 वर्षाची सुरुवातीच्या काळापासूनच कामाचा ताण वाढेल. मार्च पर्यंत कामाला घेऊन युद्धाची स्थिती उद्भवेल. एप्रिल पासून ग्रहांची स्थिती पक्षात राहील. ऑगस्ट मध्ये तणावाची स्थिती उद्भवेल.कामात मन लावा. नोकरदारवर्गाना आपल्या अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधाच्या प्रति गंभीर राहावे लागेल. आपल्या छवीला घेऊन त्यांच्या मनात सतत गोंधळ असेल.आपलं  वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगळे ठेवा. काम मन लावून कोशल्यतेने करा. वर्षाच्या अखेरीस ग्रहांची स्थिती बदलेल. पदोन्नती होईल पण ती मनाप्रमाणे नसेल.व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवसायाला वर्षाच्या मध्यकाळात वेग येईल आणि वर्षाच्या अखेरीस नवीन यश मिळेल. नवीन व्यवसाय आरंभ करत आहात तर त्यात जम बसवायला वेळ लागेल. प्रत्येक क्षेत्रात अधिक परिश्रम करावे लागेल.
 
आरोग्यासाठी कसे असणार वर्ष 2021 :
आपलं आरोग्य उत्तम राहील. आपल्या दिनचर्येला व्यवस्थित आणि सुरळीत करू शकाल. जुने असलेले आजारांपासून या वर्षी मुक्ती मिळेल आणि आपण स्वतःला अधिक निरोगी आणि उत्साही अनुभवाल. मे ते ऑगस्ट पर्यंत आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल, कारण या काळात आपल्याला पोट, लिव्हर आणि किडनीशी निगडित काही आजार उद्भवू शकतात. आपली काळजी घ्या. उर्वरित काळ आपल्या आरोग्यासाठी चांगला असेल. तणाव घेणं टाळा.आनंदी राहा.