बुधवार, 11 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2024
Written By

Weekly Horoscope साप्ताहिक राशीफल 12 ते 18फेब्रुवारी 2024

weekly horoscope
मेष : आठवड्याच्या सुरुवातीत नोकरी करणार्‍या लोकांसाठी फारच प्रगतिकारक आहे. तुम्ही तुमचे कार्य नवीन उत्साह आणि जोषात पूर्ण कराल. आठवड्याच्या सुरुवातीत तुमचा उत्साह कायम राहणार आहे. तुम्ही या आठवड्यात शक्य असल्यास स्वतःच्या भावनांवर काबू ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःच्या मजा मस्तीत धन खर्च कराल. आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही कौटुंबिक बाबींवर तुम्ही जास्त लक्ष्य देऊ शकणार नाही. महिला जातकांशी तुमचे संबंध या आठवड्यात चांगले राहणार असून त्याचा तुम्हाला फायदाही मिळणार आहे. प्रेम प्रकरणात दोघांसाठी हा आठवडा चांगला आहे. या आठवड्यात तुम्हाला देश किंवा परदेशातील यात्रा घडू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे. जे लोक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये कार्यरत आहे, त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम नसल्याने त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेला प्रभावित करू शकते. दीर्घकाळापासून चालणार्‍या आजारांपासून त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा आठवडा फारसा चांगला नाही आहे. भागीदारीच्या कार्यांमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.  
 
वृषभ : आठवड्याच्या सुरुवातीत मुलांची काळजी राहण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला मानसिक संतुलित ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर तुमची मानसिक बेचैनी आणि तुमचा राग या दोन्ही गोष्टींमुळे तुमच्या घराचे वातावरण बिघडू शकतात. आर्थिक स्थितीत निरंतर चढ उतार बघावे लागणार आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. करदारांनी कामात लक्ष द्यावे. अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. जमीन, घर, वाहन, दागिने व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीचा योग आहे. कंपनीशी निगडित कार्यांसाठी तुम्हाला विदेश यात्रा करण्याचा योग आहे. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. वडिलांचे आरोग्य तुमचे काळजीचे कारण बनू शकतं. वर्तमान काळात बायकोच्या नावावर केलेली गुंतवणुकीमुळे तुम्हाला लाभ मिळणार आहे.  तुमच्यासमोर अचानक खर्च येणार आहे त्यासाठी तयार राहा. जर तुम्ही त्यांसाठी आधीपासून योजना आखली नसेल तर तुम्हाला अडचणींना तोंड द्यावे लागेल. तुम्ही धार्मिक ज्ञानात वाढ करण्यासाठी नवीन विद्या शिकाल.  
 
मिथुन : आठवड्याच्या पहिल्या दिवशी पारिवारिक संबंधांमध्ये तणाव येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला नशिबाचा साथ मिळणार आहे. कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हसित होईल. मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. समाजात प्रतिष्ठित पद मिळू शकतो. सामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरदार कामात व्यस्त राहतील. स्त्री पक्षाचा आधार राहील. व्यवसायात भागीदार किंवा खास मित्राची मदत मिळेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक कारणांमुळे तुम्हाला विदेश यात्रा घडू शकते. ज्या लोकांना विवाह करायचा असेल त्यांच्यासाठी हा काळ फारच उत्तम ठरणार आहे. आई वडिलांचे आरोग्य उत्तम असल्यामुळे तुमच्या मनाला बरं वाटेल. तुम्ही जन कल्याणाच्या कार्यांमध्ये तुमचे सहकार्य द्याल. त्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. नवीन करार करण्यात यश मिळेल.  
 
कर्क : आठवड्याच्या सुरुवातीत तुमच्यात अधिक साहस वृत्ती राहणार आहे. व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल. विशिष्ट व्यक्तींचा संपर्क सुखद वाटेल. वरिष्ठांकडून सहयोग मिळेल. स्त्री पक्षाची स्थिती संतोषजनक राहील. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक. शत्रूंपासून सावध राहा. कृषी, जमीन, घर, सोने चांदी, फर्निचर,कपडे, कागद, मशीनरी, हॉटेल आणि रेस्टोरेंट इत्यादी व्यवसायाशी निगडित लोकांना या आठवड्यात भरपूर धन लाभ होणार आहे. जे लोकं उच्च शिक्षा प्राप्त करत आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा फारच शुभ संकेत देत आहे. विरासत मालमत्ता, गुप्तधन लाभ मिळाल्याने तुम्ही आर्थिक विषयांवर अधिक सशक्त बनाल.  
 
सिंह : आठवड्याच्या सुरुवातीत आर्थिक ओढताण राहण्याची शक्यता आहे. शांत राहण्याचा प्रयत्न करा.  इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्मसंयमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. या आठवड्यात कुठल्याही प्रकारचा नवीन धैर्य दाखवू नका. शेअर बाजार, कमिशन, दलाली इत्यादी कार्यांमध्ये आंशिक लाभ मिळण्याची उमेद तुम्ही ठेवू शकता. द्रवपदार्थांच्या व्यवसायात विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. प्रेम संबंधांमध्ये भेटीगाठीसाठी वेळ चांगला आहे.  
 
कन्या : आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुमच्यात आवेश आणि राग याचे प्रमाण जास्त राहणार आहे. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल. वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. वित्तीय प्रकरणात सावधगिरी बाळगणे फारच आवश्यक आहे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा वेळ अनुकूल असून त्यांच्यात एकाग्रता वाढेल आणि त्यांचे मन अभ्यासत लागेल. इंजिनियरिंग, रिसर्च आणि उच्च शिक्षण घेत असलेल्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. काही प्रेमपूर्ण अनुभव यंदा येऊ शकतात. हा वेळ आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. वैवाहिक जीवनासाठी आठवडा साधारण राहणार असून इतर संबंधांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या.   
 
तूळ : आठवड्याची सुरुवातीत थोडी बैचेनी राहणार आहे. या आठवड्यात तुमचे अडकलेले काम पूर्ण होतील. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकाऱ्यांपासून लाभ मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल. दृष्टिकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. शेअर बाजार, कमिशन आणि बँकिंग क्षेत्राशी निगडित लोकांना प्रगतीसाठी नवीन संधी मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.  तुमच्या धनस्‍थानात आधीपासून शनी उपस्थित आहे, म्हणून मोठ्या फायद्याची उमेद करू नका.  
 
वृश्चिक : आठवड्याच्या सुरुवातीत घरात एखादे शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. तुम्हाला वाणी आणि आपल्या व्यवहारावर विशेष लक्ष्य द्यावे लागणार आहे, आणि स्वतःवर संयम ठेवणे फारच गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत देखील हा आठवडा फारसा उत्तम नाही आहे, म्हणून वायफळ खर्च करणे टाळावे. काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. न्यायालयीन प्रकरणात अडकू शकता त्यासाठी खबरदारी घ्या. कामाचा भार अधिक राहील. महत्त्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. दूरचा प्रवास टाळा. विद्वान आणि उच्च पदाधिकारिर्‍यांसोबत भेट होण्याची शक्यता आहे.  
 
धनू : आठवड्याच्या सुरुवातीत व्यावसायिक आणि करियरशी निगडित जातक व्यस्त राहतील आणि त्यांना यश देखील मिळण्याची शक्यता आहे. व्यापार-व्यावसायिकांना दिवस संमिश्र. स्थायी मालमत्तेत तुम्ही या आठवड्यात गुंतवणूक करू शकाल. तुम्ही सुख सुविधांच्या वस्तूंची खरेदी कराल. भाऊ बहिणींच्या नात्यात आधीच्या तुलनेत गोडवा येण्याची शक्यता आहे. करियरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. आपल्या कार्य-योजनेसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ घालवणे आवडते त्यांना वेळ द्या. आरोग्याच्या बाबतीत डोळे किंवा तोंडातील आजार होण्याची शक्यता आहे. वडिलांसोबत विनम्रतेने वागायला यायला पाहिजे.   
 
मकर : आठवड्याच्या सुरुवातीत भाग्याचा साथ कमीच मिळेल. पण दरीदेखील लाभ मिळण्याची शक्यता आहे. इतरांनी दिलेले मदतीचे आश्वासन ते पूर्ण करण्यास समर्थ स्थितीत राहतील. स्थगित व्यवहार गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गी राहतील. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम वाढवावे लागतील. इतरांवर अधिक विश्वासून राहणे अहितकारक ठरण्याची दाट शक्यता आहे.  या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष्य द्यावे लागणार आहे. कुटुंब किंवा समाजाकडून एखादी दुःखद बातमी मिळू शकते. या आठवड्यात तुम्ही सर्व प्रकाराच्या वाद विवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरेसारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही.
 
कुंभ : आठवड्याच्या पाहिल्या दिवशी तुम्हाला स्वास्थ्य संबंधी लहान सहानं तक्रारी राहू शकतात. भाऊ बहिणींबरोबर तुमचे संबंध अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सर्वांची मदत मिळणार आहे. कर्म स्थळावर सूर्य भ्रमण करत असल्यामुळे नोकरी करणार्‍या लोकांचे त्यांच्या बॉसशी संबंध उत्तम राहणार आहे. शासकीय कार्यात यश मिळेल. जमीन,घर व स्थावर मालमत्ता खरेदी करताना जास्त गोंधळून जाऊ नका. या आठवड्यात तुम्हाला परदेश किंवा एखाद्या दूर जागेवर जाण्याचा योग आहे. आई किंवा कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी तुमचा मन अशांत करू शकते, म्हणून त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या आठवड्यात तुमचे वैवाहिक जीवन उत्तम असेल. परदेशात राहणार्‍या ओळखीच्या लोकांशी अधिक संवाद होण्याची शक्यता आहे.  
 
मीन : आठवड्याच्या सुरुवातीत वैवाहिक जीवनात थोडे ताण तणाव राहण्याची शक्यता आहे. तुमचे सर्व स्वप्न या आठवड्यात साकार होणार आहे, असे संकेत दिसून येत आहे. आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो. घरगुती बाबतीत अधीरता टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. व्यवसायात शत्रुपक्ष तुमच्यावर वर्चस्व साधण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तुमच्या उत्पादनाच्यागुणवत्तेत कुठल्याही प्रकारचा करार करू नये. व्यवसायात व्यस्ततेमुळे तुम्ही कुटुंबाला पूर्ण वेळ देऊ शकणार नाही. या वेळेस शासकीय विभागाकडून तुम्हाला व्यवसाय संबंधी नोटिस मिळू शकतो. नोकरी करणार्‍या लोकांची तर्क शक्ती बरीच चांगली राहणार असल्यामुळे उच्च अधिकारी देखील प्रभावित होतील.