मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : बुधवार, 17 जुलै 2019 (10:49 IST)

राज्यात 60 % महिला लैंगिक संसर्गाच्या शिकार

महिलांमध्ये लैंगिक संबंधांतून संक्रमित होणाऱ्या आजाराचे प्रमाण ६० टक्के असल्याची माहिती पुढे आली आहे.  
 
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत राज्यात आणि मुंबईत पुरुषांमध्ये अशा आजारांचे प्रमाण अनुक्रमे 35 आणि 30 टक्के, तर महिलांमध्ये 60 आणि 65 टक्के आढळून आलं आहे. स्त्रियांमध्ये गेल्या 5 वर्षांत विविध प्रकारचे लैंगिक आजार संक्रमित होण्याचे प्रमाण वाढल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचं बातमीत म्हटलं आहे.
 
जोडीदाराकडून लैंगिक आजाराचं संक्रमण होणे, मासिकपाळीमधील अस्वच्छता, चांगल्या दर्जाची अंतर्वस्त्र न वापरणं, ओले आणि दमट कपडे घालणे अशी या आजारांची वेगवेगळी कारणे आहेत.