बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जानेवारी 2020 (09:31 IST)

मेट्रो प्रकल्पांसाठी 76 हजार 299 कोटींची तरतूद

मुंबई आणि परिसरातील मेट्रो प्रकल्पांसाठी एमएमआरडीएने नव्या वर्षात ७६ हजार २९९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  
 
हा निधी २०२१पर्यंत पुरेल. प्रकल्पाला ज्या प्रमाणात गती घेईल, त्याप्रमाणे निधीचा विनियोग करण्यात येईल. या निधीतून दहिसर ते डीएननगर मेट्रो-२ अ आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ या दोन मार्गांची कामं पूर्ण होणार आहेत.
 
दरम्यान, येत्या १५ दिवसांत मेट्रो कारडेपोचाही निर्णय होईल. कारडेपो कोणत्या जागी बांधायचा यासाठी सरकारने समिती नेमली आहे. या समितीला १५ दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे.