शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 30 नोव्हेंबर 2019 (12:43 IST)

धुळे: ऊसतोड मजुरांची गाडी बोरी नदीत कोसळली, 7 ठार

धुळे जिल्ह्यातील विंचूर इथल्या नदीत गाडी कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी-शनिवारच्या मध्यरात्री ही घटना घडली.
 
मध्य प्रदेशच्या सेंधवा इथून मजुरांची एक गाडी ऊसतोडीसाठी उस्मानाबादला येत होते. तेव्हा धुळे जिल्ह्यातल्या शिरूर गावाजवळील विंचूर फाट्यावर ही गाडी पोहोचली आणि तितक्यात बोरी नदीच्या पुलावर वाहनचालकाचं गाडीवरचं नियंत्रण गेल्याने हा अपघात झाला.
 
पुलावरून खाली कोसळल्यानं गाडी चक्काचूर झाली आणि त्यातील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 1 पुरुष, 1 महिला आणि 5 बालकांचा समावेश आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मध्यप्रदेशमधील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यातील धवल्यागिर गावातील 24 मजूर आपल्या मुलांसह M.H. 25 P 3770 क्रमांकाच्या गाडीमध्ये उस्मानाबादला ऊसतोडीसाठी चालले होते.  धुळे जिल्ह्यातील शिरूड चौफुलीपुढील विंचूर शिवारातील बोरी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी नदीपात्रात पडली आणि त्यात 7 जणांचा मृत्यू झाला."
 
हा अपघात मध्यरात्री झाल्यानं रात्री उशिरापर्यंत बचत बचावकार्य सुरू होतं. किरकोळ आणि गंभीर जखमींना तात्काळ धुळे शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारारसाठी दाखल करण्यात आलं आहे.