मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 26 सप्टेंबर 2019 (10:37 IST)

'त्या दिवशी जाणते राजे घरी पळून गेले'

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
 
"संसदेत UAPAकायदा आणला तसंच अनेक दलितविरोधी कायदे आणले, त्यावेळी जाणते राजे गप्प का होते? उलट ज्या दिवशी हे कायदे संसदेत आले होते, त्या दिवशी हे जाणते राजे घरी पळून गेले होते. जाणत्या राजाला ईडीची नोटीस आली. मला वाटलं हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी बारामतीत बंद पाळला," अशा शब्दांमध्ये सुजात आंबेडकर यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे.