ठाण्यात राजकीय वातावरण तापले, शिंदे-ठाकरे गटात हाणामारी
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे व्हीव्हीयाना मॉलमध्ये जाणे, त्यानंतर त्यांना अटक होऊन झालेली जामीन, पुन्हा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची ठाणे जिल्ह्यात विकासकामांची उद्घाटने, भाषणं, त्यापाठोपाठ आव्हाड यांच्यावर दाखळ झालेला विनयभंगाचा गुन्हा यामुळे ठाण्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे.
आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यांच्यावळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात निदर्शनं केली.
आता आव्हाड यांचे कुटुंबीयही यामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
याच राजकीय घडामोडींमध्ये आता नवी घटना काल 14 नोव्हेंबर रोजी घडली आहे.
ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध आणि त्यानंतर मारामारी झाल्याचे एका व्हीडिओतून दिसून आले आहे.
ही घटना किसननगर येथे घडली आहे.
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार संजय घाडीगावकर यांची ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खासदार राजन विचारे गेले होते.
त्यावेळेस हे घोषणायुद्ध आणि हाणामारी झाली.
त्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते श्रीनगर पोलीस ठाण्यात जमले आणि तेथे राज्य राखीव दलासह पोलिसांची जादा कुमक तैनात करण्यात आली.
लोकसत्ताने प्रकाशित केलेल्या व्हीडिओमध्ये ही मारामारी दिसून येते.
Published By -Smita Joshi