वैष्णोदेवीसाठी नवा 'हाय-टेक' मार्ग
वैष्णोदेवीला जाण्यासाठी कटराहून अर्धकुंवारी नवा मार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे. या नव्या मार्गाला हाय-टेक बनवण्यासाठी अनेक अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आल्यामुळे सर्वप्रकारच्या सुविधा येथे उपलब्ध असणार आहेत.
कटरापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर कटरा रियासी मार्गावरील बिलिनी पुलाजवळ हा नवा मार्ग तयार होत आहे. या मार्गाची लांबी 7 किलोमीटरपेक्षा थोडी जास्त आहे. या मार्गावर हाय-टेक शेल्टर बनवण्यात येणार आहेत. हा मार्ग काही महिन्यांमध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. या मार्गावर तूर्तास राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशांमुळे पायी जाणाऱ्या यात्रेकरुंनाच हा मार्ग उपलब्ध असणार आहे.