1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 15 मे 2023 (17:47 IST)

Bigg Boss fame Dadoos : बिग बॉस' फेम दादूसचा हळदीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार

social media
Santosh Chaudhari (Dadus) Open Fire In Haldi :  बिगबॉस फेम दादूस म्हणजे संतोष चौधरी अडचणीत सापडले आहे. मुंबईतील शिवडी येथे एका हळदीच्या कार्यक्रमात दादूस ने हवेत गोळीबार केल्यामुळे दादूसवर कारवाई करण्याची मागणी केली जातात आहे. बिगबॉस फेम आणि आगरी कोळी गीतकार दादूस उर्फ संतोष चौधरी सध्या चर्चेत आहे. दादूस वादक सचिन भांगरे यांच्या हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झाले असता ते गाणे गात असताना त्यांनी बंदूक काढत हवेत गोळीबार केला 
 
हळदीच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हळदीच्या कार्यक्रमात त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रम होत असताना सचिन भांगरे ज्यांचे लग्न आहे दादूसच्या बाजूस नाचत होते.संतोष चौधरी यांनी गाणे म्हणता म्हणता खिश्यातुन बंदूक काढत हवेत गोळीबार केला. या घटनेचा व्हिडीओ  वायरल झाल्यावर मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला असून या संदर्भात चौकशी करण्यासाठी पोलिसांचे एक पथक सचिन भांगरे यांच्या घरी गेले होते पण तेव्हा त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते.पोलिसांनी या संदर्भात भांगरे कुटुंबियांना विचारल्यावर त्यांनी बंदूक खेळातली असल्याचे सांगितले. पुढील चौकशी साठी पोलीस दादूसला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवणार असल्याचे वृत्त आहे. काही गैर असल्यास दादूस यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. 
 
 Edited By -Priya Dixit