शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बॉलिवूडमध्ये लॉन्च होणार

फराह खान कोरिओग्राफर आहे, तशीच एक यशस्वी डायरेक्टरही. फराहच्याच 'ओम शांती ओम' या चित्रपटातून दीपिका पदुकोणने डेब्यू केला होता आणि दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. 'ओम शांती ओम' नंतर  दीपिकाने मागे वळून पाहिले नाही, ते त्याचमुळे. आता फराह खान आणखी एक नवा चेहरा बॉलिवूडमध्ये लॉन्च करतेय. हा नवा चेहरा म्हणजे, माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर. फराह खानच्या चित्रपटातून मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची खबर आहे. अलीकडे मानुषीने यासंदर्भात फराहची भेट घेतल्याचे कळतेय. चित्रपटाची स्क्रिप्ट मानुषीला आवडली असून, तिने यावर काही सुरु केले आहे. खरे तर मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये येणार, हे फार सरप्राईजिंग नाहीच. मिस वर्ल्डचा ताज जिंकल्यानंतरच तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. पण त्यावेळी ती शिकत होती. शिवाय तिला एका चांगल्या स्क्रिप्टची प्रतीक्षा होती. आता मानुषीला चांगली स्क्रिप्ट मिळाली आहे, सोबतच एक उत्तम डायरेक्टरही. आता फराहचा हा आगामी चित्रपट मानुषीच्या फिल्मी  करिअरला कसा आकार देतो, ते बघूच. तूर्तास या चित्रपटाबद्दलफार तपशील प्राप्त होऊ शकला नाही. पण मानुषी या चित्रपटाच्या तयारीसाठी गोव्याला रवाना झाली आहे.