गुरूवार, 29 सप्टेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (16:00 IST)

GHE DABBAL-30सप्टेंबरला उडणार ‘घे डबल’चा धमाका! भाऊ कदम झळकणार दुहेरी भूमिकेत !!!

मराठी पडद्यावर विनोदी आणि धमाकेदार चित्रपटाचे लवकरच आगमन होणार आहे. आणि या चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार कॉमेडी स्टार भाऊ कदम यांची दुहेरी भूमिका !
जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ या चित्रपटाचे भन्नाट टिझर पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. येत्या 30 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या चित्रपटात भाऊ कदम आणि भूषण पाटील यांची जबरदस्त जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले असून ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज् चित्रपटाचे निर्माते आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणतात, “जिओ स्टुडिओज वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यातच 'घे डबल' हा विनोदी चित्रपट ते सादर करत आहेत. हा एक निखळ मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट असून यात भाऊ कदम आणि भूषण पाटील हे दोघं विनोदवीर धुमाकूळ घालणार आहेत. आणि मला खात्री आहे की हा चित्रपट प्रेक्षकांचे डबल मनोरंजन नक्की करणार !”