मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2019 (12:12 IST)

प्रियांकाच्या गाऊनची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल अचंबित

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या 'मेट गाला'च्या लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. यंदाच्या मेट गालामध्ये प्रियांका अनोख्या अंदाजात चाहत्यांसोर आली. पण, तिच्या या वेगळ्या लूकमुळे सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. काहींना तिचा हा लूक आकर्षक वाटत आहे, तर काहींना ती विचित्र वाटत आहे. प्रियांका चोप्राच्या या गाऊनची किंमत ही तब्बल 45 लाख रुपये एवढी असल्याचं सांगण्यात येत आहे. यासोबतच प्रियांकाने जे डायमंड इयरिंग घातले आहेत त्याची किंतही जवळजवळ 10 लाख रुपये एवढी आहे. दरम्यान, प्रियांकाच्या हेअरस्टाईलिस्टने तिला 'आफ्रिकन कर्ल' स्टाईलची हेअरस्टाईल दिली. यावर एक क्राऊनही चढवला. मेट गालाच्या यंदाच्या थीमनुसार प्रियांकाचा हा लूक एकद परफेक्ट होता. पण देसी गर्लवर हा लूक अनेकांना रूचला नाही.