रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्र
महाराष्ट्रासाठी या रेल्वे अर्थसंकल्पात काही तरतूदी करण्यात आल्या आहेत. अगदी नेहमी होणार्या मागण्यांना यावेळीही वाटाण्याच्या अक्षता लावल्या गेल्या असल्या तरी काही नव्या गाड्या सुरू होणार असून काही अस्तित्वात असलेल्या गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. पुणे- नागपूर गाडी आठवड्यातून तीन दिवस धावेल. अमरावती- मुंबई एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस धावेल. वसई रोड- पनवेल गाडी नव्याने सुरू करण्यात आली असून ती आता रोज धावेल. यामुळे उपनगरीय प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. बाहेरून महाराष्ट्रात येणार्या काही गाड्या नांदेड येथील गुरूद्वारा सचखंड साहिबच्या त्रिशताब्दीनिमित्त आनंदपूर साहिब व पाटण्याहून नांदेडसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. याशिवाय १२ ते १८ ऑक्टोबरदरम्यान पुण्यात राष्ट्रकूल स्पर्धांसाठी पुणे ते दिल्ली दरम्यान नव्या गाड्या सोडण्यात येणार आहे. जबलपूर ते मुंबई दरम्यान आठवड्यातून दोन वेळा गाडी धावेल. याशिवाय भुवनेश्वर- मुंबई एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस, आसनसोल-मुंबई एक्सप्रेस, हावडा मुंबई पूर्ण आठवडाभर, विलासपूर- पुणे एक्सप्रेस आठवड्यातून एकदा. बल्हारशाह-मुंबई एक्सप्रेस रोज. अहमदाबाद- मुंबई वातानुकुलित एक्सप्रेस साप्ताहिक. वास्को-दी-गामा ते पाटणा एक्सप्रेस कोकण रेल्वेमार्गे साप्ताहिक. याशिवाय खालील सुविधा देण्यात आल्या आहेत. मुंबईकरांसाठी गो-मुंबई कार्ड विरार ते डहाणूपर्यंत ऑटोमॅटिक सिग्नल छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई बंदर वाहतुकीसाठी कुर्ला वडाळा लिंक लवकरच गोंदियामध्ये ऑटोमॅटिक सिग्नल्स लावणार जळगाव ते उधणा मार्गाचे दुपदरीकरण होणार पुणे गोंडकल मार्गाचे विद्युतीकरण करणार मुंबई-पुण्यासह पन्नासहून अधिक सिग्नलिंगचा विस्तार