शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बजेट 2008
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 26 फेब्रुवारी 2008 (15:09 IST)

ई-तिकीट नंतर आता 'एसएमएस तिकीट'

क्रांतिकारी निर्णयांसाठी प्रसिद्ध असणार्‍या रेल्वेमंत्री लालूप्रसादांनी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रवाशांना मोबाईची कळ दाबताच रेल्वे तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून तिकीट आरक्षणानंतरचा हा महत्पूर्ण टप्पा ठरणार आहे.

यासाठी मोबाईल कंपन्यांशी चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांना एसएमएसच्या माध्यमातून तिकीट उपलब्‍ध करून देण्यात येणार आहे. रेल्वे प्रवासासाठी प्रवाशास फक्त एसएमएस दाखवावा लागेल. धकाधकीच्या दिनक्रमात रेल्वे आरक्षण केंद्रावर जाऊन रांगात ताटकळत बसने बहुतेक जणांना शक्य नाही. यातून दिलासा देण्यासाठी पंधराशे स्वयंचलित तिकीट यंत्रास सुरू करणेही प्रस्तावित आहे. मुंबईत रेल्वे प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड आणण्यात येणार आहे. यासोबतच हंगामात रेलवे गाड्यांत वाढ करण्याची योजना आहे. एकंदरीत काळाची गरज ओळखून लालूंनीही माहिती तंत्रज्ञानाचा भरपूर उपयोग करून रेल्वेस कस्टमर फ्रेंडली बनवायचे ठरवले दिसते.