गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बजेट 2008
Written By वार्ता|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 26 फेब्रुवारी 2008 (18:46 IST)

पक्षपाती रेल्वे अर्थसंकल्प- भाजप

रेल्वे मंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर भाजपने आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, राजस्थान, आदी राज्यांना यात डावलण्यात आल्याची टिका भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी केली आहे. लालू प्रसाद यादव यांनी या राज्यांसोबत पक्षपात केल्याचेही त्या म्हणाल्या.

बजेटमध्ये महिलांना डावलल्याचा आरोपही स्वराज यांनी केला असून,केवळ नाममात्र नाव घेतल्याने महिलांना सुविधा दिल्याचे रेल्वे मंत्री म्हणत असल्याचे स्वराज यांचे म्हणणे आहे.गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या घोषणांची अद्यापही पूर्तता झाली नसून, रेल्वे मंत्र्यांनी आधी त्या सर्व घोषणा पूर्ण कराव्यात असे मत पक्ष प्रवक्ता विजय मल्होत्रा यांनी व्यक्त केले आहे.