मुंबई शेअर बाजारातही उत्साह
रेल्वे अर्थ संकल्पाचा सकारात्मक परिणाम आज (दि 26) मुंबई शेअर बाजारावरही दिसून आला. यातूनच धातू, गॅस, आणि तेल कंपन्यांच्या पाठबळाच्या जोरावर निर्देशांकात 155.62 अंश तर नॅशनल स्टॉक एक्सेंजमध्ये (निफ्टी) 69.35 अंशांची वाढ झाली.गेल्या काही दिवसांपासून अमेरिकी शेअर बाजारात सुधारणा दिसून येत असल्याने सर्वच अशियाई बाजारात वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बीएससी चा निर्देशांक सत्राच्या प्रारंभी सोमवारच्या मानाने 150 अंशांनी वधारत 17799.56 अंशांवर उघडला. यात फारसा फेरबदल न होता तो 17806 .19 अंशांवर तो बंद झाला.