शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. बजेट 2008
Written By वार्ता|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 26 फेब्रुवारी 2008 (15:04 IST)

रेल्वे बजेटमध्ये सवलतींचा वर्षाव

रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनी सामान्यांना खुश करणारा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. सलग पाचव्या वर्षी कोणतीही भाडेवाढ न करणारा अर्थसंकल्प मांडून एक नवा विक्रमही केला.

लालूंच्या या बजेटमध्ये सामान्यांना दिलासा देणारे बरेच काही आहे. आगामी वर्षात रेल्वे भाड्यात पाच ते सात टक्के भाडेकपात करण्यात आली आहे. मालवाहतुकीच्या भाड्यातही वाढ केलेली नाही. त्याचबरोबर वृद्ध महिला, विद्यार्थी, एड्स रूग्ण व अशोक चक्रप्राप्त जवानांना अनेक सवलती दिल्या आहेत.

लोकसभेत अतिशय गोंधळात सादर झालेल्या या अर्थसंकल्पात पन्नास किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी प्रती तिकिट एक रूपाया व त्यापुढील अंतरापर्यंत पाच टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसीच्या प्रथम श्रेणी तिकिटात सात टक्के, एसीच्या द्वितीय श्रेणीच्या तिकिटात चार टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता स्वस्त सेवा देणार्‍या हवाई सेवांना चांगलीच स्पर्धा करावी लागणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी सलग दुसर्‍या वर्षी एसी श्रेणीच्या भाड्यात कपात केली आहे.

दृष्टिक्षेपात सवलती अशा

*स्लीपर भाड्यांत पाच टक्के कपात
*एसी फर्स्ट क्लासच्या भाड्यात सात टक्के कपात
*एसी सेकंड क्लासमध्ये चार टक्के कपात
*एसी थर्ड क्लासमध्ये तीन टक्के कपात
*पन्नास किलोमीटरपुढील प्रवासासाठी सेकंड क्लासच्या भाड्यात पाच टक्के कपात
*अनुसूचित जाती व जमातीच्या तरूणांना आरक्षणापेक्षा जास्त नोकर्‍या देणार
*अशोकचक्र प्राप्त जवानांना राजधानी व शताब्दीतून मोफत प्रवासाची सवलत
*ज्येष्ट महिलांना सवलतीचे प्रमाण तीस टक्क्यांहून पन्नास टक्क्यांपर्यंत
*मदर-चाईल्ड हेल्थ एक्सप्रेस लवकरच सुरू होणार
*एड्स रूग्णांना भा़ड्यात पन्नास टक्के सवलत मिळणार
*पदवीपर्यंतच्या मुलींसाठी फ्री सिझन तिकिट
* मुंबईकरासाठी 'गो मुंबई कार्ड'